समानार्थी शब्द

अ – भाग १ (१ ते ५० शब्द)

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
अकल्पितएकाएकी घडणारे
अखंडितसतत चालणारे
अगत्यआस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर
अगम्यन समजू शकणारे
अग्नी (अनल)आग, पावक, वन्ही, विस्तव, वैश्वानर, निखारा, हुताशन
अग्रटोक
अग्रजआधी जन्मलेला
अग्रपूजापहिली पूजा
अघटितविलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य
१०अघोरभीतिदायक, भयंकर, वाईट
११अंकआकडा, मांडी
१२अंगशरीर, तनू, काया, वपु, कुडी
१३अंगणआवार
१४अंगारनिखारा, विस्तव, इंगळ, भस्म
१५अंघोळस्नान, आंघोळ
१६अचंबाआश्चर्य, नवल, विस्मय
۱७अचलस्थिर, शांत, पर्वत, गिरी, शैल
१८अचानकअनपेक्षित, अकस्मात, एकाएकी
१९अटथांबा, अंत, शेवट, समाप्ती, विश्रांती
२०अंडजपक्षी, खग
२१अडचणसमस्या, मनाई, मज्जाव, आडकाठी
२२अडथळामनाई, मज्जाव, आडकाठी
२३अतिथीपाहुणा, आगंतुक, भेटीकरी
२४अत्याचारअन्याय, जुलूम
२५अनाथपोरका
२६अनर्थसंकट
२७अनंतशाश्वत, अक्षय, चिरंतन, अमर, अंतहीन
२८अनमानहयगय, उपेक्षा, दुर्लक्ष, अनादर
२९अनुकरणनक्कल, माकडचेष्टा
३०अनुग्रहकृपा
३१अनुजनंतर जन्मलेला
३२अनुक्रमणिकायादी, सूची
३३अनृतखोटे
३४अनेकबहु, अनेकांचा समूह
३५अन्नआहार, खाद्य, भोजन
३६अपंगव्यंग, लुळा, विकलांग, पांगळा
३७अपघातदुर्घटना
३८अपराधगुन्हा, दोष, दुष्कृत्य
३९अपमानमानभंग
४०अपायइजा, त्रास, हानी
४१अपयशपराभव, हार, अपमान, अयश
४२अपेक्षाभंगहिरमोड
४३अभिनयहावभाव, अंगविक्षेप
४४अभिनेतानट
४५अभियानमोहीम, चळवळ, आंदोलन, प्रकल्प, धाड
४६अभिवादननमस्कार, वंदन, प्रणाम
४७अभिनंदनगौरव, सत्कार
४८अभिमानगर्व, अहंकार
४९अभिप्रेतअर्थ, हेतू, उद्देश
५०अभ्युदयभरभराट, उत्कर्ष

अ – भाग २ (५१ ते पुढे)

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
५१अभ्याससराव
५२अमरशाश्वत, चिरंतन, अविनाशी
५३अमापपुष्कळ, विपुल, भरपूर
५४अमितअसंख्य, अगणित, अपार, अमर्याद
५५अमृतसुधा, पीयूष, संजीवनी
५६अरण्यरान, कानन, वन, विपीन, जंगल
५७अर्जुनपार्थ, धनंजय, फाल्गुन, भारत
५८अर्थमहत्त्व, मूल्य, अभिप्राय, हेतू, कारण
५९अर्कसूर्य, दिनकर, भास्कर
६०अलंकारसौंदर्य, शोभा, लावण्य, शृंगार, दागिना
६१अल्लडनिरागस, भोळसट, निष्पाप
६२अलक्षपरमेश्वर, ईश्वर, देव
६३अवकाशअंतरिक्ष, अवधी, समय, वेळ, काळ
६४अवघडकठीण, दुरापास्त, अशक्य, विकट, दुर्घट
६५अवचितएकदम
६६अवतरणखाली येणे
६७अवर्षणदुष्काळ
६८अविरतसतत, अखंड
६९अश्वघोडा, हय, तुरग, वारू, वाजी, तुरंगम
७०अश्रूआसू
७१अशक्तरोडका, दुर्बल, क्षीण, कमजोर
७२असंख्यगंभीर, अमाप, अपरिमेय, असामान्य
७३असामीइसम, व्यक्ती, माणूस
७४अस्थिरचंचल, क्षणिक
७५अस्थीपंजरहाडांचा सापळा
७६अहंकारगर्व, ताठा, घमंड
७७अहर्निशरात्रंदिवस
७८अही (अहि)सर्प, साप, भुजंग, व्याल, तक्षक
७९अशुभवाईट, अमंगल
८०अक्षवर्ण, अक्षर, खूण, चिन्ह
८१अक्षरशब्द, वर्ण, अक्षरलेखन, लिपी
८२अक्षयनाश न पावणारे, अमर, शाश्वत, अनंत
८३अक्राळविक्राळभेसूर, भयंकर, राक्षसी, उग्र
८४अधमनीच, चांडाळ
८५अधरओठ, ओष्ट
८६अध्ययनशिकणे
८७अध्यापनशिकवणे
८८अंतिमशेवटचे
८९अंधारकाळोख, तिमिर, तम
९०अंधुकपुसट, अस्पष्ट, मंद

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
आईमाता, जननी, माय, जन्मदा, माऊली, मातोश्री
आकाशगगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष, ख, अंतराळ, आभाळ
आकांतहंबरडा, आक्रोश, रुदन
आकारघडण, रचना, ठेवण
आक्रमणहल्ला, चढाई, स्वारी, मोहीम
आकर्षणमोह, ओढ, पाश
आचरणवर्तन, चालू, पावस, चालीरीति
आजअद्य, इदमित्स, सद्य
आजाररोग, पीडा, व्याधी
१०आजारीपीडित, रोगी
११आठवणस्मरण, स्मृती, सय, ध्यान
१२आठवडासप्ताह
१३आदरमान, सन्मान, श्रद्धा
१४आदित्यसूर्य, दिनकर, भास्कर, रवी
१५आदेशआज्ञा, हुकूम
१६आधीअगोदर, प्रथम
१७आनंदमोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष, सुख, उल्हास
१८आपत्तीसंकट
१९आप्तनातलग, सगेसोयरे, कुटुंब, नातेवाईक
२०आपुलकीजवळीकता, स्नेह
२१आयुष्यजीवन, हयात
२२आयुधशस्त्र, हत्यार, उपकरण
२३आरंभसुरुवात, प्रारंभ, उगम
२४आराधनाप्रार्थना, पूजा, उपासना, भक्ती
२५आरतीओवाळणी
२६आरोहणवर चढणे
२७आरोपीगुन्हेगार, अपराधी
२८आरसादर्पण, मुकूर
२९आवाजध्वनी, रव, शब्द, कूजन, नाद, निनाद
३०आवाहनविनंती, निमंत्रण, बोलावणे
३१आवडअभिरुची, प्रीति, पसंत, होस, छंद
३२आवडताप्रिय, मनपसंत
३३आश्चर्यनवल, विस्मय, अचंबा
३४आशयभावार्थ, अर्थ, तात्पर्य
३५आशाआस, इच्छा, अपेक्षा, वासना, आकांक्षा
३६आशीर्वादशुभचिंतन
३७आश्रममठ, विहार
३८आसनबैठक
३९आसनस्थबसलेले, स्थिर
४०आसक्तीलोभ
४१आहारभोजन, खाद्य, अन्न
४२आळानिर्बंध

इ / ई

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
इच्छाइच्छित, अभिलाषा, कामना, वासना, मनोकामना
इजाजखम, व्रण, छेद, दुखापत, आघात, अपाय
इडपीडासर्व प्रकारचा त्रास
इतराज (इतराजी)गैरमर्जी, नाखूष, रुष्ट, नाराज
इतमामसरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा
इतिहासबखर
इनामबक्षीस, पारितोषिक
इमारतभवन, वास्तू, प्रासाद
इमान / इमानीप्रामाणिकपणा, प्रामाणिक, नेक, एकनिष्ठ
१०इलाखाप्रांत, विभाग
११इलाजउपाय, उपचार
१२इशारासूचना, खून, संकेत
१३इष्टइच्छित, आवडते
१४इहलोकमृत्यूलोक
१५इंद्रदेवेंद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्रक्ष
१६इंसाफन्याय, निर्णय
१७ईर्षाचुरस, स्पर्धा

उ / ऊ

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
उणीवकमतरता, न्यून, न्यूनता, अभाव, अपुरेपणा
उकलउलगडा, सुटका, मोकळे
उक्तीवचन
उग्रभयंकर, तीव्र
उजेडप्रकाश
उड्डाणझेप, भरारी
उदरपोट, पेट
उदरनिर्वाहचरितार्थ, पोट भरणे, उपजीविका
उदासखिन्न, दुःखी
१०उद्यमउद्योग
११उद्युक्ततयार
१२उधळणेफेकणे, पसरणे, फाजील खर्च करणे
१३उपजतजन्मापासून, जन्मजात
१४उपद्व्यापनखटाटोप
१५उपद्रवत्रास
१६उपवनबगीचा, बाग, उद्यान, वाटिका
१७उपहासचेष्टा, थट्टा, मस्करी
१८उपायतजवीज, इलाज, उपचार
१९उपासकभक्ती करणारा
२०उपासनाभक्ती, पूजा, आराधना, सेवा
२१उपांत्यशेवटच्याच्या आधीचा
२२उपेक्षादुर्लक्ष, हेळसांड
२३उबगवीट, जन्म, उदय
२४उभासरळ, वडा
२५उमाळातरंग, लोट, उकळी
२६उमेदहिम्मत, धैर्य, उत्साह
२७उशीरविलंब, दिरंगाई
२८उसंतविश्रांती, फुरसत, आराम
२९उच्छृंखलस्वैराचारी
३०उत्कृष्टश्रेष्ठ, उत्तम
३१उत्कर्षभरभराट, प्रगती, संपन्नता
३२उत्साहआनंद, उत्तेजना, जोश, आवेश
३३उत्सुकउत्कंठित, आसक्ती, आतुर
३४उत्सवसमारंभ, सण, सोहळा
३५उद्दामउद्धट, उर्मट, असभ्य
३६उत्पन्नमिळकत, प्राप्ती
३७उद्देशहेतू, ध्येय
३८ऊबआधार, सुख, उष्णता, वाफ
३९ऊनसूर्यप्रकाश
४०ऊर्जाशक्ती, सामर्थ्य, तीव्रता, ओज

ए / ऐ

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
एकाग्रएकतान, एकचित्त, स्थिर
एकाग्रताएकातानता
एकाएकीएकदम, अपचित
एकजूटएकी, ऐक्य
एकमेवएकच एक, अद्वितीय
एकवारएकदा, एकवेळ
एकमोडीएककल्ली, एकमार्गी
एकताऐक्य, एकी
एतद्देशीयया देशाचा
१०एहसानउपकार, दया, कृपा
११ऐटदिमाख, रुबाब, थाट, नखरा
१२ऐदीआळशी, मंद, सुस्त, जड
१३ऐच्छिकइच्छिलेले, इष्ट
१४ऐषआरामस्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख
१५ऐश्वर्यवैभव, संपत्ती
۱६ऐसपैसविस्तीर्ण, प्रशस्त, अमर्याद

क – भाग १ (१ ते ५० शब्द)

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
कटीकंबर
कटुकडू, कडवट
कठोरनिर्दय, कडक, निष्ठूर, करडा
कणवदया, माया, कृपा, कीव, करूणा
कनकसोने, कांचन, हेम, सुवर्ण
कमळपंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पदम, सरोज, कुमुदिनी, नीरज
कपाळनिढळ, भाल, ललाट, निटील, मस्तक
कपडावस्त्र, वसन, पट, अंबर
कपटलबाडी, खोटेपणा, कावा, डाव
१०कचमाघार, अडचण, संकट
११कज्जाखटला, भांडण, लढाई, तंटा
१२कसरतव्यायाम, सराव, सवय, मेहनत
१३कसबकौशल्य, प्राविण्य, खुबी
१४करहात, हस्त, किरण
१५करमणूकमनोरंजन
१६करणीकृती, कृत्य, क्रिया
१७करारवचन, ठराव, कबुली
१८करुणादया, माया, कणव
१९कर्णकान
२०कर्तबगारकार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण
२१कर्मठअतिशय धर्मशील, परिश्रमी
२२कर्मयोगप्रारब्ध, योगायोग, देव
२३कलंकडाग, बट्टा, दोष, काळिमा
२४कलहभांडण, झगडा, तंटा, वाद
२५कलागतभांडण, वैर, कळ, लावालावी
२६कल्याणहित, कुशल, क्षेम
२७कल्पतरूइच्छित गोष्ट देणारा वृक्ष
२८कल्पनायुक्ती, तोड, उपाय, पेच
२९कवचआच्छादन, आवरण, टरफल
३०कवळघास
३१कष्टाळूमेहनती
३२कष्टश्रम, मेहनत, परिश्रम
३३कसूरकुचराई, चूक, न्यूनता, दोष
३४कहाणीगोष्ट, कथा
३५काळजीचिंता, फिकीर, विवंचना, तमा
३६काठतिर, किनारा, तट
३७कानकर्ण, श्रवण, श्रोत्र
३८कावळाकाक, एकाक्ष, वायस
३९कावडीचुंबकअतिशय कंजूस
४०कामकार्य, कर्तव्य, कृत्य
४१कामनाइच्छा
४२कामधेनूइच्छित वस्तू देणारी गाय
४३काष्ठलाकूड
४४कारा (कारागृह)तुरुंग, कैदखाना
४५कारस्थानकट, स्वल, गुप्त, मसलत
४६कायदेशीरवैध, कायद्याने मान्य
४७काळसमय, वेळ, अवधी
४८काळोखअंधार, तिमिर, तम
४९कासारतलाव, गवळी
५०किरणकर, अंशु, रश्मी

क – भाग २ (५१ ते पुढे)

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
५१किल्लागड, तट, दुर्ग, कोट
५२किंमतमोल, भाव, मुल्य, दर
५३किंकरदास, सेवक
५४किमयाजादू, चमत्कार
५५कीर्तीलौकिक, प्रसिद्धी, ख्याती
५६कीडखोटे, वाईट, कीटक, गंज
५७कीलमेख, खिळा, अडसर, पाचर
५८कीवदया, कृपा, करूणा
५९कुटीर (कुटी)झोपडी
६०कुरबुरकुरकुर
६१कुरूपविद्रूप, बेढब, विरूप
६२कुशलपटाईत, क्षेम, हुशार, चतुर
६३कुमकमदत
६४कुठारकुऱ्हाड
६५कुटुंबपरिवार
६६कुत्राश्वान
६७कुतूहलउत्सुकता
६८कुटाळकुचेष्टा, टवाळी, निंदा, उपहास
६९कुभांडआळ, कट, कारस्थान, लबाडी
७०कुरापतखोडी, कुचाळी, थट्टा, टवाळकी
७१कूजनपक्षाचे गाणे
७२कूर्मकासव, कमट, कच्छ
७३कृपणकंजूष, चिकू
७४कृशहडकूळा
७५कशिदाभरतकाम
७६कुकर्मवाईट काम
७७कोठारभांडार
७८कोमलनाजूक, मऊ, मृदू, सुंदर
७९कोंडाभुगा, भूय, चुरा, तूस
८०कोंभअंकुर, मोड, खांब, कोंब
८१कोळीष्टकजळमट
८२क्रूरनिर्दयी
८३क्रमअनुक्रम, रांग, ओळ, पद्धती
८४क्रोधराग, संताप
८५क्लेशवेदना, दुःख, पीडा

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
खगपक्षी, विहग, विहंग, अंडज, द्विज, पाखरू
खडकदगड, पाषाण, मोठा दगड
खडगतलवार, समशेर
खटाटोपप्रयत्न
खट्याळखोडकर, द्वाड, उनाड, हुड, उपद्व्यापी
खटकाभांडण, वाद, झगडा, तंटा, कलह
खटाराबैलगाडी, धूड, छकडा
खजिनाद्रव्य, कोष, भांडार, तिजोरी
खचगर्दी, दाटी, रास
१०खजिटरशरमिंदा, लज्जित, ओशाळा
११खरासच्चा, प्रामाणिक, सरळ, विश्वास
१२खरेपणान्यायनीती
१३खलाशीनावाडी, नाखवा, खारवा, कोळी
१४खबरबातमी, वार्ता, संदेश, माहिती
१५खरमरीतप्रखर, खणखणी, तीक्षण, सडेतोड
१६खचितनिश्चित, खात्री, रखरोखर
१७खाटबाज, खाटले, बाजले
१८खासखुद, स्वतःविशेष, मुद्दाम
१९खूणसंकेत, ईशारा, चिन्ह
२०खूळगडबड, छंद, वेड
२१खुषीसंतोष, तोष, समाधान, आनंद, प्रसन्नता
२२खुळामूर्ख, वेडा, अक्कलशून्य, बावळा
२३खुळचटपुळचट, नेभळा, भित्रा
२४खूपपुष्कळ, भरपूर, विपुल
२५खिडकीगवाक्ष
२६खेळकुडीथट्टा, खेळ, गंमत
२७खेडेगाव, ग्राम
२८खेडूतगावकरी, ग्रामस्थ
२९खेदवैषम्य, विषाद, दुःख, खिन्नता, हुरहुर
३०खंदासाहसी, धाडसी, सामर्थ्यवान
३१खंकदीन, दरिद्री, द्रव्यहीन, निर्धन
३२ख्यातीकीर्ती, प्रसिद्धी, लौकिक

Leave a Reply