समानार्थी शब्द (क, ख, ग, घ, ङ)

क – भाग १ (१ ते ५० शब्द)

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
कटीकंबर
कटुकडू, कडवट
कठोरनिर्दय, कडक, निष्ठूर, करडा
कणवदया, माया, कृपा, कीव, करूणा
कनकसोने, कांचन, हेम, सुवर्ण
कमळपंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पदम, सरोज, कुमुदिनी, नीरज
कपाळनिढळ, भाल, ललाट, निटील, मस्तक
कपडावस्त्र, वसन, पट, अंबर
कपटलबाडी, खोटेपणा, कावा, डाव
१०कचमाघार, अडचण, संकट
११कज्जाखटला, भांडण, लढाई, तंटा
१२कसरतव्यायाम, सराव, सवय, मेहनत
१३कसबकौशल्य, प्राविण्य, खुबी
१४करहात, हस्त, किरण
१५करमणूकमनोरंजन
१६करणीकृती, कृत्य, क्रिया
१७करारवचन, ठराव, कबुली
१८करुणादया, माया, कणव
१९कर्णकान
२०कर्तबगारकार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण
२१कर्मठअतिशय धर्मशील, परिश्रमी
२२कर्मयोगप्रारब्ध, योगायोग, देव
२३कलंकडाग, बट्टा, दोष, काळिमा
२४कलहभांडण, झगडा, तंटा, वाद
२५कलागतभांडण, वैर, कळ, लावालावी
२६कल्याणहित, कुशल, क्षेम
२७कल्पतरूइच्छित गोष्ट देणारा वृक्ष
२८कल्पनायुक्ती, तोड, उपाय, पेच
२९कवचआच्छादन, आवरण, टरफल
३०कवळघास
३१कष्टाळूमेहनती
३२कष्टश्रम, मेहनत, परिश्रम
३३कसूरकुचराई, चूक, न्यूनता, दोष
३४कहाणीगोष्ट, कथा
३५काळजीचिंता, फिकीर, विवंचना, तमा
३६काठतिर, किनारा, तट
३७कानकर्ण, श्रवण, श्रोत्र
३८कावळाकाक, एकाक्ष, वायस
३९कावडीचुंबकअतिशय कंजूस
४०कामकार्य, कर्तव्य, कृत्य
४१कामनाइच्छा
४२कामधेनूइच्छित वस्तू देणारी गाय
४३काष्ठलाकूड
४४कारा (कारागृह)तुरुंग, कैदखाना
४५कारस्थानकट, स्वल, गुप्त, मसलत
४६कायदेशीरवैध, कायद्याने मान्य
४७काळसमय, वेळ, अवधी
४८काळोखअंधार, तिमिर, तम
४९कासारतलाव, गवळी
५०किरणकर, अंशु, रश्मी

क – भाग २ (५१ ते पुढे)

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
५१किल्लागड, तट, दुर्ग, कोट
५२किंमतमोल, भाव, मुल्य, दर
५३किंकरदास, सेवक
५४किमयाजादू, चमत्कार
५५कीर्तीलौकिक, प्रसिद्धी, ख्याती
५६कीडखोटे, वाईट, कीटक, गंज
५७कीलमेख, खिळा, अडसर, पाचर
५८कीवदया, कृपा, करूणा
५९कुटीर (कुटी)झोपडी
६०कुरबुरकुरकुर
६१कुरूपविद्रूप, बेढब, विरूप
६२कुशलपटाईत, क्षेम, हुशार, चतुर
६३कुमकमदत
६४कुठारकुऱ्हाड
६५कुटुंबपरिवार
६६कुत्राश्वान
६७कुतूहलउत्सुकता
६८कुटाळकुचेष्टा, टवाळी, निंदा, उपहास
६९कुभांडआळ, कट, कारस्थान, लबाडी
७०कुरापतखोडी, कुचाळी, थट्टा, टवाळकी
७१कूजनपक्षाचे गाणे
७२कूर्मकासव, कमट, कच्छ
७३कृपणकंजूष, चिकू
७४कृशहडकूळा
७५कशिदाभरतकाम
७६कुकर्मवाईट काम
७७कोठारभांडार
७८कोमलनाजूक, मऊ, मृदू, सुंदर
७९कोंडाभुगा, भूय, चुरा, तूस
८०कोंभअंकुर, मोड, खांब, कोंब
८१कोळीष्टकजळमट
८२क्रूरनिर्दयी
८३क्रमअनुक्रम, रांग, ओळ, पद्धती
८४क्रोधराग, संताप
८५क्लेशवेदना, दुःख, पीडा

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
खगपक्षी, विहग, विहंग, अंडज, द्विज, पाखरू
खडकदगड, पाषाण, मोठा दगड
खडगतलवार, समशेर
खटाटोपप्रयत्न
खट्याळखोडकर, द्वाड, उनाड, हुड, उपद्व्यापी
खटकाभांडण, वाद, झगडा, तंटा, कलह
खटाराबैलगाडी, धूड, छकडा
खजिनाद्रव्य, कोष, भांडार, तिजोरी
खचगर्दी, दाटी, रास
१०खजिटरशरमिंदा, लज्जित, ओशाळा
११खरासच्चा, प्रामाणिक, सरळ, विश्वास
१२खरेपणान्यायनीती
१३खलाशीनावाडी, नाखवा, खारवा, कोळी
१४खबरबातमी, वार्ता, संदेश, माहिती
१५खरमरीतप्रखर, खणखणी, तीक्षण, सडेतोड
१६खचितनिश्चित, खात्री, रखरोखर
१७खाटबाज, खाटले, बाजले
१८खासखुद, स्वतःविशेष, मुद्दाम
१९खूणसंकेत, ईशारा, चिन्ह
२०खूळगडबड, छंद, वेड
२१खुषीसंतोष, तोष, समाधान, आनंद, प्रसन्नता
२२खुळामूर्ख, वेडा, अक्कलशून्य, बावळा
२३खुळचटपुळचट, नेभळा, भित्रा
२४खूपपुष्कळ, भरपूर, विपुल
२५खिडकीगवाक्ष
२६खेळकुडीथट्टा, खेळ, गंमत
२७खेडेगाव, ग्राम
२८खेडूतगावकरी, ग्रामस्थ
२९खेदवैषम्य, विषाद, दुःख, खिन्नता, हुरहुर
३०खंदासाहसी, धाडसी, सामर्थ्यवान
३१खंकदीन, दरिद्री, द्रव्यहीन, निर्धन
३२ख्यातीकीर्ती, प्रसिद्धी, लौकिक

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
गगनजाईवायुमंडल, आकाश, अंतराळ, गगन, नभ
गटसमूह, संघ, मंडळ, सभा, पंथ
गडपअदृश्य, बेपत्ता, नष्ट
गदारोळगोंधळ, ओरड, खटाटोप, दंगा, हुल्लड
गनीमशत्रू, अरी
गबाळाअजागळ, बावळट, मूर्ख, बावळा
गरजजरुरी, आवश्यकता, निकड, आव्हान, अनिवार्य, अत्यावश्यक
गरुडखगेंद्र, द्विजराज, वैनतेय
गर्वअहंकार, ताठा, घमंड, ताण
१०गस्तपहारा, रखवाली, रावण
११गहनकळण्यास कठीण, खोल, गाढ, गंभीर, गुंतागुंतीचा, दुर्गम
१२गवईगायक
१३गवततृण, दुर्बल, अशक्त, क्षीण, कमजोर, नाजूक, बारीक, तुरळ, सपक
१४गवाक्षखिडकी
१५गयावयाकाकुळती, करूणा, विनवणी, याचना
१६गणपतीगजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, विनायक, विकट, हेरंब, गणेश, विग्नेश, गौरीनंदन, गौरीसुत, व्यंकटेश, एकदंत, प्रथमेश, गणनायक, गणराज, अमेय, गजवंदन, बुद्धीमत्ता, गणाधीश
१७गाणेगीत, गान
१८गाथाकविता, आर्या, काव्य
१९गायधेनु, गो, गोमाता, कामधेनू
२०गावग्राम, खेडे
२१गावठीअडाणी, आडमुठा, खेडवळ, गावंढळ
२२गिरीपर्वत, डोंगर, अचल
२३गुच्छझुबका, घोस, तुरा
२४गुद्दाबुक्का, ठोसा, रट्टा
२५गुन्हाअपराध
२६गुलामीदास्य
२७गूढगुप्त गोष्ट, रहस्यमय, गुप्त, अज्ञात, अवघड, लपून राहणारा
२८गृहिणीघरधनीन
२९गृहधाम, घर, सदन, भवन, निवास
३०गोगाय, धेनु
३१गोडमधुर
३२गोणीपोते
३३गोधूमगहू
३४गोतगोत्र, वंश, पिढी, कूळ
३५गोपाळकन्हैया, कृष्ण, मोहन, मुरलीधर, गोविंद, गिरिधर
३६गोष्टकथा, कहाणी, हकिकत
३७गोषवारासारांश, संक्षेप, तात्पर्य
३८गौरवअभिनंदन, सन्मान, सत्कार
३९ग्रंथपुस्तक, शास्त्र, लेख, ग्रंथलेख, वाङ्मय, साहित्य
४०ग्रस्तत्रासलेला
४१ग्रहकल्पना, समजूत, भावना
४२ग्रामगाव
४३ग्राहकगिऱ्हाईक

अनु.मूळ शब्दसमानार्थी शब्द
घटमडके, पात्र, भांडे, तूट
घटकाघडी, पडदा, पट, घडयाळ
घट्टघन, जाड, दाट
घडामोडखटाटोप, उलथापालथ, फेरफार, व्यवहार
घनिष्ठदाट, अगदी जवळचे
घरसदन, गृह, निवास, भवन, गेह, आलय, निकेतन, धाम
घरटेखोपा
घडीघटका, पडदा, पट, घडयाळ, दुमड, संच, बस्तान, रचना
घातनारा, हंगाम, वध
१०घागरघडा, मडके
۱१घाण (घाणेरडा)ओंगळ, घामट, गलिच्छ
१२घावप्रहार, वार, आघात, तडाखा
१३घासकवळ, ग्रास, गवत, तृण, चारा
१४घाईगडबड, त्वरा, तातडी, जलदी
१५घामस्वेद, धर्म
१६घृणाशिसारी, किळस, तिटकरा
१७घोटचूळ, आवंडा, घुटका
१८घोरकाळजी, चिंता, विवंचना
१९घेरचक्कर, प्रदक्षिणा, फिरणे, वर्तुळ, परिसर, परीध, लेढा
२०घोडाहय, तुरग, वारू, वाजी, अश्व
२१घवघवीतभरपूर

Leave a Reply